Jagdish Patil
मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू आगामी निवडणुकांसाठी आपापल्या पक्षांची युती करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
अखेर आज राज आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची युती झाल्याचं जाहीर केलं.
या घोषणेमुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर युतीच्या या घोषणेपूर्वी ठाकरे बंधूंनी नेमंकं काय काय केलं ते पाहूया.
राजकीय युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वी, उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले.
यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी राज आणि उद्धव दोघांचं एकत्र औक्षण केलं.
त्यानंतर हे दोन्ही नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतलं.
यावेळी अमित आणि आदित्य ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं.
त्यानंतर वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं.
यावेळी राज आणि उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत देखील खुर्चीवर बसले होते.
यावेळी उद्धव ठाकरेंनी 'मराठी माणसांना तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका', असं भावनिक आवाहन केलं.
तर 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार,' असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.