Chetan Zadpe
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
अडवाणी यांना सुरुवातीपासूनच चित्रपट पाहण्याची आवड होती. संघाच्या 'ऑर्गनायझर' मासिकात ते चित्रपट परीक्षणे लिहीत असत.
लालकृष्ण अडवाणी जनसंघात होते, त्याच वेळी अटलबिहारी वाजपेयीही जनसंघाशी जोडले गेले होते.
1958 मध्ये दिल्लीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसंघाचा पराभव झाला होता, त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांची निराशा झाली होती.
तो क्षण आठवून लालकृष्ण अडवाणी त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात, "निवडणूक हरलो म्हणून निराश होऊन आम्ही शांत बसलो होतो, मग अचानक अटलजी म्हणाले, लाल, चल टॉकीजला जावून पिक्चर बघू..."
"सुरुवातीला मला थोडा धक्काच बसला पण, नंतर मी होकार दिला. आम्ही दोघे दिल्लीतील इम्पोरियल सिनेमा हॉलमध्ये गेलो, असे अडवाणी म्हणाले.
एका मुलाखतीत अडवाणी म्हणाले की, 'अटलजी यांना आमीर खानचे चित्रपट आवडत असत. '