Chetan Zadpe
उर्मिला मातोडकर यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत हुकूमत गाजवली. नरसिम्हा या चित्रपटातून उर्मिला यांनी पदार्पण केले. रंगीला हा पहिल्या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली.
उर्मिला मातोडकर यांनी 3 मार्च 2016 रोजी आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या मोहसीन मीर अख्तरसोबत लग्न करत, प्रेमासाठी जाती-धर्माची रेषा ओलांडली!
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सत्या' या चित्रपटाचे अनन्यसाधरण महत्त्व आहे. या चित्रपटाची नायिका उर्मिला मातोंडकर आहेत.
उर्मिला मातोडकर आपल्या राजकीय इनिंगची काँग्रेसपासून केली. मागील काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सहभाग नोंदवत, राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला होता.
उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमध्ये फार काळ रमता आले नाही. काँग्रेसला जय महाराष्ट्र करत त्यांनी शिवसेनेते प्रवेश केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोंडकर यांचा शिवसेना पक्ष प्रवेश झाला होता. आजही त्या ठाकरे गटात सक्रिय आहेत.
काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर आपली निष्ठा ठेवली. पक्षप्रवेशावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
शिवसेना प्रवेश केवळ विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी होता, अशी चर्चा होती. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेच्या यादीत त्यांचे नावही होते. मात्र ठाकरेंचे सरकार कोसळल्याने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.