Roshan More
अटल बीमित व्यक्ति कल्याण योजनेअंतर्गत नोकरी सुटल्यास कर्मचाऱ्यांना ९० दिवसांपर्यंत ५०% पगार दिला जातो. केंद्र सरकारने या योजनेला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ही योजना ESIC (कर्मचारी राज्य विमा निगम) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. यामध्ये मिळणारी आर्थिक मदत आयुष्यात एकदाच ३ महिन्यांसाठी मिळते.
कर्मचाऱ्याने नोकरी सुटण्यापूर्वी किमान १ वर्ष काम केलेले असणे आणि ESIC मध्ये नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. तसेच, किमान ७८ दिवसांचे योगदान ESIC मध्ये जमा असावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचा मासिक पगार २१,००० रुपयांपेक्षा जास्त नसावा. कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा ०.७५% रक्कम ESIC कपातीपोटी कापली जाते.
जर तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असाल, तर वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नोकरी सुटल्यानंतर ३० दिवसांनी तुम्ही या भत्त्यासाठी दावा करू शकता.
दावा करण्यासाठी ESIC च्या 'www.esic.in' पोर्टलवर जाऊन ABVKY Eligibility वर क्लिक करा. तिथे तुमचा इन्शुरन्स नंबर आणि मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
क्लेम करण्यासाठी प्रतिज्ञापत्र, ओळख पुरावा आणि बँकेच्या खात्याचा तपशील आवश्यक असतो. ही कागदपत्रे आणि क्लेम फॉर्म जवळच्या ESIC शाखेत जमा करावा लागतो.
तुमच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बेरोजगारी भत्त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर तुमचा शेवटचा पगार २० हजार असेल, तर दरमहा १० हजार रुपये मिळतील.