Atal Pension Yojana : अटल पेंशन योजनेसाठी कोण पात्र आहे? अर्ज करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!

Rashmi Mane

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी निवृत्तीवेतन योजना आहे. या योजनेत नियमित गुंतवणूक करून वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा निश्चित पेन्शन मिळवता येते. देशातील लाखो नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

Pension Scheme | Sarkarnama

आर्थिक आधार

नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होते.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

कोण अर्ज करू शकतो?

18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. अर्जदाराकडे सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

कोण पात्र नाही?

1 ऑक्टोबर 2022 नंतर आयकर भरणारे किंवा पूर्वी आयकर भरलेले नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच कॉर्पोरेट संस्था या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत.

Pension Scheme 2025 | Sarkarnama

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम आपल्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेची माहिती घ्या.

Pension Scheme 2025 | Sarkarnama

लिंक करणे आवश्यक

अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचे बँक खाते अटल पेन्शन योजनेशी जोडले जाते. त्यानंतर दरमहा निश्चित हप्ता आपोआप खात्यातून वजा होतो.

Pension | sarkarnama

किती वर्षे गुंतवणूक करावी?

या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीची रक्कम तुमचे वय आणि निवडलेल्या पेन्शन योजनेनुसार ठरते.

Atal Pension Yojana | Sarkarnama

पेन्शनसाठी किती भरावे लागेल?

18 वर्षांच्या व्यक्तीला दरमहा 210 रुपये भरावे लागतात. तर 30 वर्षांच्या व्यक्तीला 5,000 रुपयांची मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 577 रुपये गुंतवावे लागतात. लवकर गुंतवणूक सुरू केल्यास कमी हप्त्यात अधिक लाभ मिळू शकतो.

Next : भारतात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन! जाणून घ्या काय आहे या ‘ग्रीन ट्रेन’ची खासियत

येथे क्लिक करा