खासगी नोकरी असली तरीही पेन्शनची चिंता मिटणार; 'या' योजनेअंतर्गत दरमहा 5 हजार मिळणार

Jagdish Patil

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी केंद्राची योजना आहे.

Atal Pension Yojana | Sarkarnama

वय

१८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. ३० व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास ६० वर्षांपर्यंत हप्ते भरावे लागतात.

Atal Pension Yojana | Sarkarnama

गुंतवणूक

योजनेत मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने गुंतवणूक करता येते. हप्त्याची रक्कम निवडलेल्या पेन्शननुसार ठरते.

Atal Pension Yojana | Sarkarnama

खाते

१ ऑक्टोबर २०२२ पासून प्राप्तिकर भरणाऱ्या नागरिकांना नवीन खाते उघडता येत नाही. मात्र, त्यापूर्वी खाते उघडलेले गुंतवणूक सुरू ठेवू शकतात.

Atal Pension Yojana | Sarkarnama

नोंदणी

बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याद्वारे प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन नावनोंदणी करता येते. हप्त्याची रक्कम खात्यातून ऑटो-डेबिट होते.

Atal Pension Yojana | Sarkarnama

पेन्शन

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडलेल्या पेन्शन स्लॅबनुसार खातेदाराला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते.

Atal Pension Yojana

नॉमिनी

खातेदाराच्या निधनानंतर त्याच्या पती किंवा पत्नीला तीच मासिक पेन्शन मिळते. दोघांच्याही निधनानंतर नॉमिनीला निधी परत केला जातो.

Atal Pension Yojana | Sarkarnama

पर्याय

५,००० रुपये मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास खातेदार आणि जोडीदाराच्या निधनानंतर नॉमिनीला सुमारे ८.५ लाख रुपये मिळतात.

Atal Pension Yojana

हमी

या योजनेत निश्चित पेन्शनची हमी दिली जाते. गुंतवणुकीवरील परतावा कमी पडल्यास केंद्र सरकार तूट भरून काढते.

Atal Pension Yojana | Sarkarnama

NEXT : अक्करमाशी ते शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : कोण आहेत शरणकुमार लिंबाळे?

Sharankumar Limbale
क्लिक करा