Jagdish Patil
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत.
आतिशी यांच्यासह देशातील विविध राज्याचं 16 महिला मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केलं आहे. त्या कोण ते जाणून घेऊया.
बहुजन समाज पार्टीच्या मायावती आणि काँग्रेसच्या सुचेता कृपलानी यांनी उत्तर प्रदेशातील CM पदाची धुरा सांभाळली आहे.
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम पक्षाच्या व्ही. एन. जानकी आणि जे. जयललिता या दोघींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे.
भाजपच्या वसुंधरा राजे यांनी राजस्थान, आनंदीबेन पटेल यांनी गुजरात आणि उमा भारती यांनी मध्यप्रदेशचा कारभार सांभाळला आहे.
काँग्रेस पक्षाच्या नंदिनी सेतूपती यांनी ओडिशा, अन्वरा तैमूर यांनी आसाम आणि राजिंदर कौर भट्टल यांनी पंजाब राज्याचं नेतृत्व केलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या सध्या पश्चिम बंगालच्या CM पदी आहेत.
जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या महबुबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
तर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राष्ट्रीय जनता दलाच्या राबडीदेवी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या शशिकला काकोडकर यांनी गोव्याचं CM पद सांभाळलं आहे.