Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे.
PM Modi वयाच्या 74 व्या वर्षी सक्रिय आणि तंदुरुस्त आहेत, त्यांचा फिटनेस कधी कधी 25-30 वर्षांच्या तरुणांनाही लाजवेल असा आहे.
मोदी हे बहुतांश वेळ प्रशासकीय कामात व्यस्त असतात. अनेक दिवस परदेश दौऱ्यांवरून परतल्यानंतरही ते महत्त्वाच्या सभा, रॅली आदींना हजेरी लावताना दिसतात. आता तुम्ही विचार करत असाल की वयाच्या 74 व्या वर्षी या एनर्जीचे रहस्य काय आहे?
योग आणि संतुलित आहार हा मोदींच्या तंदुरुस्तीचा मूलमंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात.
स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी रोज योगासने करतात. रोज सकाळी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांसह मोदींच्या दिवसाची सुरुवात होते.
पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. विविध सणांच्या निमित्ताने ते उपवासही करत असतात. पण एरवीही मोदींचा आहार हलका व संतुलितच असतो. शेवग्याच्या शेंगांचे पराठे मोदींना आवडतात. आठवड्यातून किमान दोनदा ते असे पराठे खातात.
पंतप्रधान मोदी यांचे रात्रीचे जेवणही सहसा हलकेच असते. यात गुजराती खिचडी खाणे त्यांना पसंत आहे. तसेच सायंकाळी सहानंतर मोदी काहीही खात नाहीत.
पंतप्रधान मोदी यांचा संपूर्ण दिवस विविध कामांमध्येच जातो. आरामासाठी ते जास्त वेळही घेत नाहीत. रोज त्यांना साडेतीन तास झोपतात.