सरकारनामा ब्यूरो
चेकबुक साठी तुम्हाला एटीएम मधून सुद्धा अर्ज करता येणार आहे. एटीएम मधून अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी चेकबुक तुमच्या पत्त्यावर मिळते.
एटीएम मधून तुम्हाला बँक अकाउंट स्टेटमेंट सुद्धा काढता येते. अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला ताबडतोब प्रिंट करून मिळते.
एटीएममध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करता येऊ शकतो. पण ही सुविधा काही निवडक एटीएम मध्येच मिळते.
एटीएम कार्डचा पिन तुम्हाला प्रत्येक एटीएम मध्ये बदलता येऊ शकतो. नवीन एटीएम असेल तर पिन जनरेट करता येते.
एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. दोन्ही अकाउंट एकाच बँकेचे असतील तर ही प्रक्रिया जलद होते.
वीज, पाणी, मोबाईल किंवा गॅस बिले देखील भरता येतात.
बँक अकाउंट मध्ये किती शिल्लक आहे याची माहिती पाहता येते. ही माहिती तुम्हाला एटीएम च्या स्क्रीनवरच दिसते.
मिनी स्टेटमेंट सुद्धा तपासता येणार आहे. पाच ते दहा व्यवहारांची माहिती पाहू शकता.