Vijaykumar Dudhale
सोलापूर येथील सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला हिरेहब्बू यांच्या वाड्यात नंदीध्वजाच्या पूजनाने शनिवारी (ता. १३ जानेवारी) सुरुवात झाली.
सिद्धेश्वर महाराज यात्रेतील सिद्धेश्वर महाराज आणि कुंभार कन्येचा विवाह सोहळा संमती कट्ट्यावर मोठ्या उत्साहात झाला. शेकडो वर्षांपूर्वी श्री सिद्धेश्वर महाराज यांचा योगदंडाशी कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह झाला होता.
सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूर लोकसभेचे भाजपचे समन्वयक अमर साबळे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार रोहित पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे हे प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रथमच सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला हजेरी लावली. तेही बाराबंदी घालून अक्षता सोहळ्याला उपस्थित होते.
अमर साबळे यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी साबळे यांचेही नाव चर्चेत आहे, त्यामुळे साबळे यांची सिद्धेश्वर यात्रेला हजेरी चर्चेची ठरली होती.
सोमवारी (ता. १५ जानेवारी) सायंकाळी हिरेहब्बू वाड्यातून सर्व नंदीध्वज होमप्रदीपन सोहळ्यासाठी मार्गस्थ होणार आहेत. रात्री नऊच्या सुमारास होम मैदानावरील होम कुंडाजवळ ते होमप्रदीपन सोहळा होणार आहे. सोमवारी पहिल्या नंदीध्वजास नागफणा लावण्यात येणार आहे.
सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यावेळी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे पत्रिका वाटप करण्यात आली. त्याचबरोबर अक्षताही देण्यात येत होत्या.
नवरदेवाप्रमाणे सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडासह नंदीध्वजांना हळद लावून आणि बाशिंग बांधून वरात निघते. या वरातीत रस्त्याच्या दुतर्फा असंख्य सुवासिनींनी महिलांनी नंदीध्वजांचे श्रध्दापूर्वक औक्षण केले. घराघरातून भाविकांनी आणलेले बाशिंग नंदीध्वजांना बांधले जात होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील स्ट्रेट फॉरवर्ड नेता : पृथ्वीराज चव्हाण