Vijaykumar Dudhale
पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 17 मार्च 1946 रोजी मध्य प्रांतातील इंदूरमध्ये झाला. त्यांचे वडील दाजीसाहेब आणि आई प्रेमलाकाकी चव्हाण दोघेही काँग्रेसचे खासदार होते.
चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण कराडमध्ये झाले. वडील दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीतील नूतन मराठी विद्यालयात ते शिकले. पिलानी येथून ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले. युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. त्यांनी अमेरिकेत डिझाईन अभियंता म्हणून काही काळ काम केले.
राजीव गांधी यांच्या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणात आले. ते 1991 मध्ये पहिल्यांदा कराड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकीत ते कराडमधून पराभूत झाले.
लोकसभेला पराभूत झाल्यानंतरही काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर नियुक्त केले. ते 2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) बनले.
अकरा नोव्हेंबर 2010 मध्ये ते महाराष्ट्राचे 17 वे मुख्यमंत्री बनले. ते सप्टेंबर 2014 पर्यंत मुख्यमंत्रिपदी होते.
कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण हे 2014 पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचा विवाह सत्वशीला यांच्याशी 16 डिसेंबर 1976 रोजी झाला. वडील दाजीसाहेब, आई प्रेमलाकाकी यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हेही खासदार होते.
मुख्यमंत्री शिंदे बनले स्वच्छतादूत ; कौपिनेश्वर मंदिराची साफसफाई