Rajanand More
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
हल्ल्यानंतर पहलगामसह काश्मीरमधील अनेक भागांतून पर्यटक माघारी परतले आहेत. त्यामुळे तुरळकच पर्यटक दिसत असल्याने तेथील व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाम गाठत काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे.
काश्मीरला चला, आपल्याला इथे यायचंय, दहशतवादाला हरवायचंय, अशा कवितेच्या ओळींमधून अतुल यांनी पहलगामध्ये जाऊन पर्यटकांना जणू आमंत्रित केले आहे.
अतुल यांनी काश्मीरला रिकाम्या जाणाऱ्या विमानाचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या फोटोत विमानात केवळ एकच महिला प्रवासी असल्याचे दिसत आहे.
काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतरचे काही फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये त्यांच्या हातात क्रिकटची बॅट असून ते एका काश्मिरी व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत.
झेलम नदीच्या किनारी निवांत क्षण अनुभवतानाचा फोटोही अतुल यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
अतुल यांनी एक खास कविताही पोस्ट केली आहे. चलिए जी कश्मीर चलें, सिंधू, झेलम किनार चलें, कश्मीरियत की बात सुनें, कश्मीरियों की बात बनें, चलिए जी, कश्मीर चलें, हमको यहाँ आना है, आतंक को हराना है, अशी ती कविता आहे.