Rajanand More
जगातील बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आहे. अमेरिका नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारताचे दृढ संबंध आहे. देशाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनीही मोदींना सोबतीचे आश्वासन दिले.
भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही दशतवादाविरोधात दंड थोपटले आहेत.
अत्यंत छोटा पण पर्यटनात मोठी झेप घेतलेल्या मॉरिशिअसनेही भारताला पाठिंबा दिला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनीही मोदींना फोन केला होता.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स भारतात असतानाच दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर व्हान्स यांनीही मोदींना अमेरिका आपल्यासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.
इस्त्रायलही भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींशी फोनवरून संवाद साधला आपण सोबत असल्याचे आश्वासन दिले.
किंग अब्दुल्लाह
जॉर्डनचे किंग अब्दुल्ला (दुसरे) यांनीही पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा केली आहे.
जगात सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले जपानही भारताच्या बाजूने आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी भारताच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केली आहे.
भारत आणि फ्रान्समधील संबंध अनेक वर्षांपासूनचे आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्यॅनुल मॅक्रॉन यांनी हल्ल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्डिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींना फोन करत दहशतवादाविरोधात सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदींशी संवाद साधलेल्या नेत्यांमध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अल्बेल फत्ताह अल सिसी यांचाही समावेश आहे.
नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्कूफ यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. हल्ल्याबाबत त्यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.
यूकेसारखा बलाढ्य देशही भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मोदींशी फोनवरून संवाद साधत साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.