Mangesh Mahale
ऑटोचालक असलेल्या विजय धामू यांना अभिनेते विजय यांनी आपल्या टीव्हीके पक्षाकडून रॉयपुरम मतदारसंघात तिकीट दिले.
विजय धामू यांनी 55 हजाराहून अधिक मते मिळवून आपल्या विरोधकाचा 14000 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
पाच वेळा एआयएडीएमकेचे आमदार राहिलेले आणि ज्येष्ठ नेते डी. जयकुमार आणि डीएमकेचे उमेदवार सुबैर खान यांचा त्यांनी पराभव केला.
विजय धामू यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही,रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एक सामान्य नागरिक आहेत.
रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक वर्षांपासून ते थलापती विजय यांचे कट्टर चाहते असून परिसरात त्यांचा फॅन क्लब चालवतात.
प्रचारादरम्यान स्वतः विजय यांनी त्यांना मिठी मारली होती. या भावूक फोटोने सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणली.
विजय धामू यांचा ऑटो स्टँडपासून विधानसभेपर्यंतचा प्रवास आता टीव्हीकेच्या 'सर्वसामान्य माणूस' अजेंड्याचे सर्वात मोठे प्रतीक बनला आहे.