Rashmi Mane
आज (10 फेब्रुवारी) झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यात अवनी लेखरा या विद्यार्थीनीचाही सहभाग होता. पण कोण आहे अवनी लेखरा जाणून घेऊया.
वयाच्या 22व्या वर्षी अवनी लेखरा यांनी दोन पॅरालिंपिक सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
अवनी 11 वर्षांची असताना, एका कार अपघातानंतर तिला कंबरेपासून खालचा भाग अर्धांगवायू झाला. असे असूनही, अवनीने तिच्या अडचणींना तोंड दिले आणि दृढनिश्चयाने पुढे गेली.
2011 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, तिने नेमबाजी क्षेत्रात भारताची पहिली महिला नेमबाज म्हणून पदक जिंकून इतिहास रचला.
2011 मध्ये झालेल्या एका रस्ते अपघातानंतर तिला व्हीलचेअरवरच राहावे लागले, परंतु तिच्या वडिलांनी तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होण्यासाठी खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.
अवनीने हार मानली नाही आणि ती धनुर्विद्या सुरू केली आणि नंतर २०१५ मध्ये नेमबाजी सुरू केली. भारताचा पहिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्याकडून तिला ही प्रेरणा मिळाली.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानासाठी त्यांना 2021 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जो भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.
तिने ज्युनियर आणि सिनियर दोन्ही स्तरावर जागतिक विक्रम केले आहेत.