Rashmi Mane
1803 - थोर समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म. जी.आय.पी.रेल्वे, राणीचा बाग, मुलींची पहिली शाळा अशा अनेक उपक्रमांचे ते संस्थापक होते. मॅट्रिकला संस्कृतसाठी दिली जाणारी प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती त्यांच्याच नावाने दिली जाते.
1929 - जे.आर.डी टाटा पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले
1945 - माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते राजेश पायलट यांचा जन्म
1949 - पुणे विद्यापीठाची स्थापना. पुढे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्या आले
Dinvishesh 10 February
1949 - महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाच्या खटल्यात नथुराम गोडसे, नाना आपटे यांना फाशी सुनावण्यात आली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली
1974 - "प्रभात'कार वा. रा. कोठारी यांचे निधन. ब्राह्मणेतर चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात त्यांचा पुढाकार होता.
1982 - प्रख्यात विचारवंत, समीक्षक नरहर कुरुंदकर यांचे निधन.
1997 - व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, "मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अनिल अवचट यांचे निधन.
2001 - जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचे निधन.
2005 - पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध म्हणून शिवसैनिकांनी मोहाली स्टेडियमची खेळपट्टी उखडली