FASTag हातात धरून स्कॅन करता? तुमचं खातं होऊ शकतं ब्लॅकलिस्ट! काय आहे नवा नियम?

Rashmi Mane

...तर FASTag होईल ब्लॅकलिस्ट!

फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी नवा नियम लागू, एक चूक महागात पडू शकते!

FASTag Pass | Sarkarnama

नवा नियम काय आहे?

NHAI ने फास्टॅग वापराबाबत नवा नियम लागू केला आहे. 'टॅग इन हॅड' म्हणजे हातात फास्टॅग दाखवणाऱ्यांचे FASTag आता ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जातील.

FASTag Pass | Sarkarnama

विंडशिल्डवरच फास्टॅग हवा!

फास्टॅग स्टिकर वाहनाच्या समोरील काचेला (विंडशिल्ड) नीट चिकटवलेला असणे आवश्यक आहे.

FASTag money refund trick | Sarkarnama

नियम मोडल्यास काय होईल?

नियम मोडल्यास तुमचा FASTag ब्लॅकलिस्टमध्ये जाईल आणि पुन्हा वापर करता येणार नाही. त्यामुळे पुढील प्रवासात टोलनाक्यावर अडचण येऊ शकते.

FASTag money refund trick

फसवणुकीमुळे हा निर्णय..

हलक्या वाहनाचा फास्टॅग स्टिकर अवजड वाहनाला लावला जातो त्यामुळे मोठ्या गाड्यांना टोल कमी आकारला जातो. हा गैरवापर थांबवण्यासाठीच 'हातात धरलेला फास्टॅग बंदी' लागू झाली आहे.

FASTag money refund trick

‘टॅग इन हॅड’ म्हणजे काय?

फास्टॅग काचेवर न चिकटवता हातात धरून स्कॅन करणं म्हणजे 'टॅग इन हॅड'
हे टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे.

FASTag money refund trick

गैरप्रकार थांबवण्यासाठी उपाय

टोलनाका कर्मचारी ‘लूज फास्टॅग’ असलेल्यांची तक्रार ई-मेलने करू शकतात.
त्या फास्टॅगवर तत्काळ कारवाई केली जाईल.

FASTag

Next : सरकारचा मोठा निर्णय! आता FD, शेअर्स अन् गोल्ड लोन अकाउंटवरूनही UPI पेमेंट शक्य...

येथे क्लिक करा