सरकारनामा ब्यूरो
छत्तीसगड केडरचे IAS अधिकारी अवनीश कुमार शरण यांची सक्सेस स्टोरी ही UPSC करणाऱ्या विद्यार्थांना खूप प्रेरणादायी आहे.
बिहारचे समस्तीपुर येथील रहिवासी असलेले अवनीश यांनी घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असल्याने त्यांना अभ्यासात खूप अडथळे आले आहेत.
ते लहानपणापासून अभ्यासात हुशार नव्हते. पण त्यांचं स्वप्नं होतं की, त्यांना IAS अधिकारी व्हायचं आहे.
अवनीश शरण यांना दहावीला फक्त 44 टक्के पडले होते. बारावीला 65 टक्के आणि ग्रॅज्युएशनला 60 टक्के होते.
यानंतर त्यांनी UPSC ची परीक्षा देण्याचे ठरवले. मात्र, UPSC परीक्षेत त्यांना तब्बल दहावेळा अपयश आले.
दहावेळा नापास होऊनही त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी हार न मानता अकराव्यांदा परीक्षा दिली.
यावेळी अकराव्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहचले. आणि दुसऱ्या प्रयत्नात 77 वी रँक मिळवत ते आयएएस झाले.
अवनीश शरण हे सध्या छत्तीसगड राज्यातील बिलासपूर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.