Jagdish Patil
अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.
खामेनी यांच्यासह मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला आहे.
खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा शोक आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
1939 मध्ये इराणच्या मशहद या शहरातील एका धार्मिक कुटुंबात खामेनी यांचा जन्म झाला.
मशहदमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोम शहरात गेले.
1962 पासून त्यांनी इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रझा पहलवी (शहा) यांच्या विरोधात राजकीय लढा सुरू केला.
खामेनी यांना इराणच्या इस्लामी क्रांतीच्या आधी अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला होता.
1989 मध्ये अयातोल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इराणची सूत्रं हातात घेतली.
खामेनी हे इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरचे (IRGC) कमांडर-इन-चीफही होते.
1960 च्या दरम्यान त्यांना इराणमधून हद्दपार केलं होतं. मात्र, 1979 च्या क्रांतीनंतर ते पुन्हा इराणमध्ये परतले.
एका भीषण स्फोटात खामेनी यांचा उजवा हात कायमस्वरुपी निष्क्रिय झाल्याचं सांगितलं जातं.