Aslam Shanedivan
इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद जगाला बसत असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकी हल्ल्यात मृत्यू झाला आहे
याच हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू यांचाही मृत्यू झाला आहे. यानंतर आता हे युद्ध भडकण्याची स्थिती उद्भवली आहे.
अशातच आता इराणच्या सुप्रीम लीडर कोण अशा चर्चा होत असनाताच आयातुल्ला अराफी, मोहसीन कोमी आणि गुलाम हुसेन एजई अशी नावे समोर येत आहेत.
दरम्यान ब्रिगेडियर जनरल अहमद वहीदी यांची नवे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कमांडर-इन-चीफ हुसैन सलामी यांच्या मृत्यूनंतर वहीदी यांच्या खांद्यावर संपूर्ण सैन्याची धुरा देण्यात आली असून ते IRGC चे उप-प्रमुख होते
वहीदी यांनी यापूर्वी इराणचे गृहमंत्री आणि कुद्स फोर्सचे कमांडर म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
वहीदी यांना युद्धाचा मोठा अनुभव असून त्यांची नियुक्त होताच त्यांनी खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.
वाहिदी आयआरजीसीच्या कुद्स फोर्सचे पहिले कमांडर होते. तर ते महमूद अहमदीनेजाद यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणूनही कार्यरत होते.