सरकारनामा ब्यूरो
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.
हे मंदिर कुलपती चंद्रकांत सोमपुरा यांच्या नेतृत्वाखाली सोमपुरा कुटुंबाकडून उभारले जात आहे.
हे मंदिर राम भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान आहे.
मंदिराच्या मधल्या परिसरात उल्लेखनीय सुंदर अशी वास्तुकला करण्यात आली आहे.
मंदिराची मुख्य रचना तीन मजली असून यात पाच मंडप असतील तसेच मंदिर 161 फूट उंचीचे असणार आहे.
राम मंदिर परिसराचा बहुतांश भाग हा शेकडो वृक्ष असलेला हिरवागार असा निर्सगरम्य परिसर असणार आहे.
राम मंदिराच्या ऐतिहासिक 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला या राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठापणा' सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या मंदिराच्या भव्यतेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.