Sunil Balasaheb Dhumal
अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परळी वैद्यनाथ नगरीत भव्य शोभायात्रा पार पडली.
या शोभायात्रेत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी आवर्जून सहभाग घेतला.
प्रभू श्रीराम व रामभक्त हनुमान यांच्या भव्य प्रतिकृतींचे आकर्षण होते.
शोभायात्रेत मुंडे बहीण-भावाच्या हस्ते श्रीरामांची आरती करण्यात आली.
ढोल ताशांच्या गजर, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि श्रीरामाचा जयघोषाने शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
भगवे झेंडे, रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषा केलेली मुले व महिला वेशभूषेसह सहभागी झाले होते.
परळीकरांनी आपापल्या घरावर प्रभु श्रीरामाचे फोटो असलेले ध्वज, भगव्या पताका, विद्युत रोषणाई केली होती.