Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना सोहळा आज पार पडला.
या सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण होते.
प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी, जिथे संपूर्ण देश राममय झाला होता. तेव्हा मुकेश अंबानींचा भव्य अँटिलियाही रामाच्या रंगात रंगला होता.
मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अप्रतिम फोटो व्हायरल होत आहे.
त्यात अँटिलियाची खास सजावट बघायला मिळते. घर रंगीबेरंगी दिवे आणि पुष्पगुच्छांनी सजवले आहे.
इमारतीवर राम मंदिराच्या चित्रासोबत जय श्री राम लिहिलेले लाईटींग केले आहे.