Rashmi Mane
अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस शिल्लक आहेत.
22 जानेवारी ला होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातून भाविकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केलीये.
राम मंदिराचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे.
अशात रात्रीच्या अंधारातील राम मंदिराचे मनमोहक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
रामजन्मभूमी ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर कसं दिसतं याचे काही आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
राम मंदिराचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
राम मंदिराचे रात्रीच्या वेळचे फोटो पाहून अनेकांनी या ठिकाणी भेट देण्याची इच्छा व्यक्त केलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला स्वत: राम लाल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
अयोध्या नगरी रामभक्तीत पूर्णपणे बुडालेली दिसत आहे. सर्वत्र सजावट केली जात आहे.