सरकारनामा ब्यूरो
36 वर्षीय अमित कटारीया हे 2004 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
मूळचे गुडगाव येथील कटारिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दंतेवाडा दौऱ्यादरम्यान त्यांचे स्वागत केल्याप्रकरणी प्रसिद्धीच्या झोतात आले.
कटारीया यांचा जन्म दिल्लीत झाला आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले.
दिल्लीच्या आर.के. पब्लिक स्कूल पूरममधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली.
पदवी पूर्ण करताच ते यूपीएससी परीक्षेला बसले अन् पहिल्याच प्रयत्नात त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
देशात 18 वा क्रमांक मिळवत यूपीएससीत त्यांनी यश मिळवले आणि IAS अधिकारी झाले.
गरियाबंदचे कलेक्टर आणि नया रायपूर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांनी काम केले आहे.
सध्या ते बस्तरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.