Mangesh Mahale
रामाच्या मूर्तीला पाहून ही मूर्ती श्यामल रंगाची का, असाही अनेकांना प्रश्न पडला आहे. त्याचे कारण जाणून घ्या.
श्यामल रंगाचा राम असे अनेकदा वर्णन आपण ऐकले आहे. ही मूर्ती श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्ती म्हणून निर्माण केली आहे.
महर्षी वाल्मीकी यांच्या रामायणामध्ये रामाचे वर्णन हे श्यामल रंगात करण्यात आले आहे.
अयोध्येतील रामाची मूर्ती ही श्याम शिळेपासून तयार करण्यात आली आहे. या शिळेला खूप महत्त्व आहे.
पूजा करताना चंदन, गंध अशा वस्तूंचा वापर केल्याने श्यामशिळा खराब होत नाही.
मूर्तीचे वजन सुमारे २०० किलो आहे. उंची ४.२४ फूट, तर रुंदी ३ फूट आहे.
म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे.