Rashmi Mane
सध्या अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम रात्रंदिवस वेगाने सुरू आहे.
22 जानेवारीला 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट' मंदिर उभारणीच्या प्रगतीच्या माहितीचे फोटो ट्विटरवर शेअर करत असतात.
मंदिर उभारणीच्या जवळजवळ 80 टक्के काम पूर्ण झाले असून गृहमंडप आणि सिंहद्वारचेही काम पूर्णत्वास आले आहे.
राम मंदिर हजारो वर्षासाठी सुरक्षित राहावे यासाठी 'रिटेनिंग वॉल' बांधण्यात येत आहे.
राम मंदिरामध्ये महर्षी वाल्मिक, महर्षी विश्वामित्र, महर्षी वशिष्ठ, निषाद राज, शबरी यांच्या मंदिरांची बांधले जाणार आहेत.
22 जानेवारी 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान राम यांचा अभिषेक करतील.
हे फोटो पाहून राम मंदिर तयार झाल्यावर किती भव्य दिसेल याचा अंदाज बांधता येतोय.
याआधीही बांधकामादरम्यानची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.