Rashmi Mane
केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते. याद्वारे IAS, IPS, IFS अशा एकूण 24 विविध सेवांसाठी भरती केली जाते.
पण अनेक लोक यूपीएससी न क्रॅक करताही सरकारमध्ये क्लास वन अधिकारी बनतात.
1. राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय कामाच्या अनुभवाच्या आधारे
2. लॅटरल एंट्रीद्वारे नागरी सेवा
राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर सुमारे 12-15 वर्षे एसडीएम म्हणून काम केल्यानंतर एखाद्याला आयएएस दर्जाची पदोन्नती मिळू शकते.
अधिकाऱ्याची कारकिर्दीत कधीही चौकशी होता कामा नये.
सेवा कालावधीत कोणतेही आरोपपत्र असू नये.
अधिकाऱ्याचे वय ५४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे लॅटरल एंट्री स्कीम. याद्वारे, तीन टप्प्यांची UPSC नागरी सेवा परीक्षा न देता सहसंचालक किंवा सचिव स्तरावरील नियुक्ती केली जाते.
यासाठी खासगी कंपनीत काम करणारा 40 वर्षांपर्यंतचा कोणताही अधिकारी अर्ज करू शकतो. त्याला संबंधित क्षेत्रात कामाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा.
अर्ज केल्यानंतर, भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मुलाखत द्यावी लागते.