Rashmi Mane
अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याची तारीख आता जवळ आली आहे. 22 जानेवारी 2024ला हा दिमाखदार आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या मंदिरासाठी लढा देणारे नेते कोण जाणून घेऊया....
लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढत देशामध्ये राम मंदिरासाठी लढा उभारला.
मुरली मनोहर जोशी यांनीही राम मंदिर लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
राम मंदिर लढ्यात उमा भारतींना देशभरात राजकीय ओळख मिळाली.
राम मंदिर लढ्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने जाणूनबूजून कारसेवकांना रोखले नाही, असा कल्याण सिंह यांच्यावर आरोप होता.
राम मंदिर आंदोलनासाठी 'बजरंग दल'ची स्थापना करण्यात आली आणि 'आरएसएस'ने पहिले अध्यक्ष म्हणून विनय कटियार यांच्याकडे जबाबदारी सोपवली.
विश्व हिंदू परिषदेचे आणखी एक नेते प्रवीण तोगडिया हे राममंदिर आंदोलनाच्या काळात खूप सक्रिय होते.
सुषमा स्वराज यांनी राम मंदिर लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता.
राम मंदिर लढ्यासाठी प्रमोद महाजनांनी महाराष्ट्रातून पुढाकार घेतला होता.
रामजन्मभूमी आंदोलनाला जन्म देणाऱ्यांमध्ये अशोक सिंघल हे प्रमुख नाव होते.