CCTV झाकून राम मंदिरात कशी व्हायची पैशांची चोरी?

Ganesh Sonawane

8 जणांना अटक

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ आरोपीपैंकी सहाजण देणगी मोजणीच्या कामाशी थेट संबंधित होते.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

CCTV

SIT च्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, रोकड मोजण्यापूर्वी एका कर्मचाऱ्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून किंवा तात्पुरते तेथील दृश्य कॅमेऱ्यामध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

नोटांचे बंडल

त्यानंतर इतर कर्मचारी देणगी पेट्यांमधील नोटांचे बंडल कपड्यांमध्ये किंवा खिशात लपवत असत.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

बाथरुममध्ये लपवत

ही रोकड मंदिर परिसरातील शौचालयात आधीच तयार करून ठेवलेल्या ठिकाणी लपवून ठेवली जात असे.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

रक्कम गायब

कामाचा दिवस संपल्यानंतर किंवा कोणाला संशय येणार नाही याची खात्री पटल्यानंतर रक्कम बाहेर नेली जात होती.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

CCTV फुटेज

एसआयटीला मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये आरोपी मनीष यादव हा अनेक वेळा देणगी पेट्यांमधून पैसे काढताना दिसल्याचे सांगण्यात आले आहे.

Ram Mandir Donation Theft | Sarkarnama

प्रकार सुरूच

मात्र, त्या वेळी कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने चोरीचे प्रकार सुरूच राहिल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

Ram Mandir

नातेवाईक

आरोपींमध्ये काही जण हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचेही समोर येत असून, त्यामुळे हे संपूर्ण जाळे संगनमताने चालत असल्याचा संशय बळावला.

Ram Mandir Donation Scam | Sarkarnama

NEXT : राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणात पहिला राजीनामा : कोण आहेत चंपत राय?

Ram Mandir Donation Thef | Sarkarnama
येथे क्लिक करा