Rashmi Mane
आयुषी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
तिच्या प्रवासात अनेक अडथळे आले पण तिने हार मानली नाही. क्षणभरही ती तिच्या ध्येयापासून दूर गेली नाही. प्रत्येक पावलावर ती स्वतःला प्रेरित करत राहिली.
आयुषी प्रधानने बारीपाडा येथील सेंट ॲन्स कॉन्व्हेंट स्कूलमधून दहावीचे शिक्षण घेतले आहे. तिला 93.5 टक्के गुण मिळाले होते. तर 12वीला 93 टक्के गुण मिळाले.
भुवनेश्वर येथील सीईटी म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षेची तयारी केली.
आयुषी प्रधानने यूपीएससी परीक्षेत तीनदा प्रयत्न केले. आयुषीने 2023 मध्ये पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली. यामध्ये त्यांना 36 वा क्रमांक मिळाला आहे. यासह त्यांची आयएएस केडरसाठी निवडही झाली.
त्यांना उत्तराखंडमधील मसुरी येथील 'एलबीएसएनएए'मध्ये 2 वर्षे राहावे लागेल. दरम्यान, त्यांना व्यावहारिक अनुभवासाठी फील्ड पोस्टिंग देखील दिली जाईल. यानंतर त्यांना आयएएस अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग मिळणार आहे.
आयएएस अधिकारी होण्यासाठी आयुषी प्रधानने त्यांच्या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहिले, नोट्स तयार केल्या आणि सर्व संकल्पना नीट समजून घेतल्या. आयुषीला ऑनलाईन मेंटॉरशिपचाही खूप फायदा झाला.
मागील वर्षांचे UPSC पेपर सोडवले, ज्यामुळे त्यांना UPSC परीक्षेचा पॅटर्न समजण्यास मदत झाली. त्यांच्या तयारीत त्यांनी रिव्हर्स लर्निंगला महत्त्व दिले होते.