Pradeep Pendhare
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2026 रोजी आठ वर्षे पूर्ण झाली.
योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते.Ayushman Bharat PMJAY
भाजपच्या दाव्यानुसार, आतापर्यंत 50 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा झाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांच्या दाव्यानुसार, योजनेअंतर्गत 13 कोटींहून अधिक रुग्णालयीन प्रवेश झाले आहेत.
प्रदीप भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, आयुष्यमान भारत योजनेवर आतापर्यंत ₹2 लाख कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
आयुष्यमान भारत कार्यक्रम केवळ PM-JAYपुरता मर्यादित नाही. आयुष्मान आरोग्य मंदिरे, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अन् प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, यांचाही समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील आरोग्य व्यवस्थेवर टीका केली.
50 कोटींहून अधिक लाभार्थी आणि 13 कोटींहून अधिक रुग्णालयीन प्रवेशाचा भाजपचा दावा.