Jagdish Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची झारखंडमधून घोषणा केली.
आयुष्मान भारतद्वारे 50 कोटींहून अधिक लोकांना परवडणाऱ्या दरात सरकार आरोग्यसेवा पुरवते. PMJAY योजना कॅशलेस आणि पेपरलेस सेवा आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. रुग्णालयात दाखल होण्यासठी जवळपास 10.7 कोटी लोकांना आरोग्य विमा संरक्षण मिळते.
जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) आणि UHC अजेंडा PMJAY योजनेशी सुसंगत आहेत.
2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDG) "कोणालाही मागे न ठेवता" हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आयुष्मान योजनेतही प्रतिबिंबित होते.
PMJAY योजना विशिष्ट आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असून एप्रिल 2023 पर्यंत, देशात 1,59,662 आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) च्या 71 व्या अहवालानुसार शहरी भागातील 82 आणि ग्रामीण भागातील 85.9 टक्के कुटुंबांना आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध नाही.
रुग्णालयात राहण्यापासून ते रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापर्यंत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना रुग्णांचा खर्च भागवते.
ही योजना राबवण्यासाठी 30 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी केंद्रासोबत सामंजस्य करार केले आहेत.