Pradeep Pendhare
राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती कार्यरत आहे.
आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचारांसाठी वयोमर्यादा 70 ऐवजी 60 वर्ष, असावी अशी शिफारस केली आहे.
उपचारांसाठी देण्यात येणारी पाच लाखांची रक्कम 10 लाख रुपये करावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा विस्तार करत सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांचा AB-PMJAY वय वंदना योजनेअंतर्गत समावेश केला.
आयुष्यमान भारत योजना जगातील सर्वा मोठी योजना असून केंद्र सरकारने 2017 मध्ये योजना सुरू केली होती.
देशातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचार मिळतात.
योजनेत सर्व आजारांचा समावेश असून, वैद्यकीय चाचणी, शस्त्रक्रिया आणि वाहतुकीचा खर्च देखील दिला जातो.
NEXT : मॅरिशसच्या तलावात गंगा कशी अवतरली? पंतप्रधान मोदींनी दिली भेट