Roshan More
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच माॅरिशस दौऱ्यावर गेले होते.
मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांनी पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' प्रदान केला.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी मॉरिशसच्या दौऱ्यादरम्यान पवित्र गंगा तलावाला भेट दिली.
पंतप्रधा मोदी यांनी गंगा तलाव येथे प्रार्थना केली आणि प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगममधून आणलेल्या पवित्र जलाचे विसर्जन केले.
गंगा तलाव मॉरिशसमध्ये ग्रँड बेसिन म्हणूनही ओळखले जातो.
गंगा तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे 550 मीटर उंचीवर आहे.
तलावाच्या काठावर एक मंदिर देखील आहे.
1897 च्या सुमारास एका हिंदू पुजाऱ्याने गंगा तलाव हे ठिकाण शोधून काढले होते.1970 च्या दशकात भारतातील एका पुजाऱ्याने गंगेतून पवित्र पाणी आणले आणि ते पवित्र पाणी तलावात ओतले त्यामुळे त्याचे नाव 'गंगा तलाव' असे पडले.