Jagdish Patil
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील मंदिरात प्रवेश करण्यावरून मोठा वाद झाला.
यावेळी भाजप आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्याने ड्यूटीवर असलेल्या PSI सविता पाटील यांच्या कानशिलात लगावली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका झाली. त्यामुळे आमदार गौडा यांनी मुलीच्या कृत्याबद्दल माफी मागितली.
दरम्यान, महिला PSI सविता पाटील यांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार बी. सुरेश गौडा यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
सुरेश गौडा हे कर्नाटकातील भाजपचे प्रमुख नेते आणि तुमकुर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
२००८ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१३ आणि २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते तिसऱ्यांदा आमदार बनले.
सुरेश गौडा यांनी याआधी भाजपचे तुमकुर जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
त्यांनी बंगळुरू येथील आर.सी. कॉलेजमधून वाणिज्य शाखेतील पदवी घेतली आहे.