Rajanand More
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
सिद्दीकी यांच्या हत्तेमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत सोशल मीडियात गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारल्याबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
झिशान हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असून त्यांच्या कार्यालयाबाहेरच हत्या झाली आहे. झिशान हे आमदार आहेत.
अर्शिया या बाबा सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. झिशानपेक्षा त्या मोठ्या असून वडिलांचे त्यांच्यावर अपार प्रेम होते. सोशल मीडियातील एका पोस्टमध्येच वडिलांनी मुलीबाबत आपले प्रेम व्यक्त केले होते.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बाबा सिद्दीकी 29 जुलैला सोशल मीडियात म्हटले होते की, तू माझी ताकद आहेत, माझा अभिमान आहे. नेहमीच माझ्यासोबत असशील.
अर्शिया या पेशाने डॉक्टर आहेत. काही कंपन्यांच्या सहसंस्थापक म्हणूनही त्या काम पाहत आहेत. लंडनमध्ये त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे.
अर्शिया यांचे सुरूवातीचे उच्च शिक्षण मुंबईतच झाले. त्यामुळे वडिलांचे राजकारण जवळून पाहिल्याने त्यांना राजकारणात रस होता. मात्र, त्या यामध्ये रमल्या नाहीत.
बाबा सिद्दीकी यांची कोट्यवधींची संपत्ती असून झिशान आणि अर्शिया या संपत्तीचे वारस आहे. 2015 च्या निवडणुकीत सादर केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी 76 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते.