Jagdish Patil
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.
तर सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली आहे.
त्यामुळे आता सलमान खानच्या जवळच्या लोकांना या गँगने लक्ष केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. ज्यामध्ये सलमानला इशारा देत अनुजच्या नावाचा उल्लेख केला आहे.
तर सिद्दकी हत्या आणि सलमान खानच्या घरावरील गोळीबारामुळे चर्चेत आलेला अनुज थापन कोण आहे जाणून घेऊया.
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुज थापन यांना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
त्यानंतर अनुजने मुंबई क्राईम ब्रँचच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो मूळचा पंजाबचा होता.
पोलिसांनी अटक केलेले हल्लेखोर बिश्नोई गँगमधील असल्याने सलमानच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे.