Roshan More
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतली. त्यामुळे ते दोघे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
बाबा सिद्दीकी तीन वेळा काँग्रेसकडून आमदार झाले आहेत. (Baba Siddique News )
बाबा सिद्दीकी यांनी एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय होते.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबई महापालिकेत बाबा सिद्दीकी यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे.
इफ्तार पार्टीमुळे सिद्दीकी चर्चेत असतात. त्यांच्या इफ्तारसाठी बाॅलिवूडमधील मोठे कलाकार, राजकीय नेते उपस्थित असतात.
तेलगंणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाबा सिद्दीकी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी तेलंगणामध्ये गेले होते.
सलमान खानसोबत मैत्री
बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत बाबा सिद्दीकी यांची मैत्री आहे. सलमान खान याच्या कठीण काळात बाबा सिद्दीक यांनी मदत केल्याची चर्चा आहे.
मी काँग्रेसमध्येच
झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले आहे. मात्र, आपल्या वडिलांच्या निर्णया विषयी आपल्यास माहीत नसल्याचे झिशान म्हणाले.