सरकारनामा ब्यूरो
2024 मध्ये भारताने अनेक दिग्गज व्यक्तींना गमावले. कोण आहे ते जाणून घेऊयात...
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 ला वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1991-2002 याहून अधिक काळ टाटा समूहाचे नेतृत्व केले.
बाबा सिद्दीकी यांचे 12 ऑक्टोबर 2024 ला निधन झाले. ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सदस्य होते. त्यांनी सलग तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले.
ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या 89 वर्षी 20 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हरियाणाचा पाच वेळा मुख्यमंत्रीचा पदाचा कार्यभार त्यांनी पाहिला.
सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. त्यांनी 12 सप्टेंबरला अखेरचा श्वास घेतला.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी 13 मे 2024 ला अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाने ग्रस्त होते.
भारताचे महान तबला वादक म्हणून झाकीर हुसेन यांची ओळख होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांच निधन झाले.
ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी आजारपणामुळे निधन झाले.त्यांनी EMI आणि T-Series सारख्या संगीत कंपनीबरोबर सर्वाधिक वेळा काम केले.
ज्यांच्या आवाजांनी संपूर्ण देशाला वेड लावले असे महान रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारीला निधन झाले. त्यांचा 'बिनाका गितमाला' हा रेडिओ कार्यक्रम खूप प्रसिध्द हाता.