सरकारनामा ब्यूरो
मुलाखतीदरम्यान साडीवर विचारलेल्या एका प्रश्नाने भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)अधिकारी बनण्यासाठी कशी मदत केली. याची प्रेरणादायी स्टोरी एकदा वाचाचं...
UPSC परीक्षेची मुलाखत 2025 ला होणार आहे, तर यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील यांचीचं सगळीकडे चर्चा होतीये.
एक अशी अधिकारी आहे ज्यांना साडीच्या बॅार्डरवर प्रश्न विचारला आणि त्याचेचं उत्तर दिल्यामुळे त्या थेट यूपीएससी परीक्षा पास झाल्या.
त्या आहेत अपाला मिश्रा त्यांना मुलाखतीत 215 मार्क मिळाले आहेत.
अपाला यांची मुलाखत तब्बल 40 मिनिटांची चालली. यात त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.
त्यांना मुलाखतीदरम्यान घालून आलेल्या साडीवर प्रश्न विचारण्यात आला, त्यांनी कोणत्या प्रकारची साडी घातली आहे, तसेच त्यावरील बॅार्डरची काय खासियत आहे.
यावेळी अपाला यांनी उत्तर दिले, या साडीवरील बॅार्डर ही आर्टवर्क असून यात सामान्य लोकांच्या जीवनाचे वर्णन केले आहे.
अपाला यांनी 2020 मध्ये UPSCची परीक्षा दिली होती. यात त्यांना 9 वा रँक मिळला, रँकनुसार त्यांची निवड IFS अधिकारी म्हणून करण्यात आली.