Babanrao Gholap : अत्यंत रंजक राजकीय कारकीर्द असलेले बबनराव घोलप

Amol Sutar

माजी मंत्री

बबनराव घोलप हे राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आहेत.

Babanrao Gholap | Sarkarnama

आमदार

एक दोन वेळा नव्हे तर तब्बल पाचवेळा ते नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Vidhan Sabha | Sarkarnama

शिवसेना

बबनराव घोलप यांनी 1985 मध्ये शिवसेनेतर्फे मशाल या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

पुनरागमन

1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते समाज कल्याण मंत्री बनले होते. 

Babanrao Gholap | Sarkarnama

पहिले मंत्री

त्यांनी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडले आहे. चीन देशातील बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे ते जगातील पहिले मंत्री ठरले आहेत.

Babanrao Gholap | Sarkarnama

भटक्या समाजाला

भटक्या समाजाला 350 आश्रम शाळा, 300 वसतिगृहे, 6 सूतगिरण्या व 400 वृद्धाश्रम बबनराव घोलप यांनी उभारले आहेत. 

Babanrao Gholap | Sarkarnama

स्थापना

त्यांनी छोट्या – मोठ्या 200 संघटना विसर्जित करून महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला होता.

Sangha | Sarkarnama

 कला क्षेत्रात योगदान

चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. राजा शिव छत्रपती या सह्याद्री वाहिनी वरील प्रदर्शित झालेल्या मालिकेचे ते निर्माते आहेत. अनेक चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 

Babanrao Gholap | Sarkarnama

जय महाराष्ट्र

बबनराव घोलप यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Babanrao Gholap | Sarkarnama

NEXT : Jnanpith Award to Gulzar : गीतकार, कवी, चित्रपट दिग्दर्शक गुलजार 'ज्ञानपीठ'चे मानकरी

येथे क्लिक करा