Rashmi Mane
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून आलेले शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा, जबलपूर-हैदराबादसह चार प्रमुख महामार्ग ठप्प झाले आहेत. तब्बल 15 तासांहून अधिक काळ हजारो वाहने महामार्गांवर अडकून पडल्याने नागरिक आणि प्रवाशांचे हाल झाले आहेत.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह समाजातील दुर्बल घटकांच्या हितासाठी आठ प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी!
बच्चू कडूंची पहिली आणि प्रमुख मागणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण मुक्तता मिळावी.
कृषी मालाला हमीभावावर (MSP) 20% अनुदान!
शेतकऱ्यांचा नफा निश्चित करण्यासाठी आणि उत्पादनाचे योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी MSP वर अतिरिक्त अनुदानाची मागणी.
ग्रामीण घरकुलांना शहरासारखे 5 लाखांचे अनुदान!
ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुलासाठी समान आर्थिक मदत आणि शहरासारखा विकासाचा हक्क प्रत्येक गावकऱ्याला मिळावा.
पेरणी ते कापणीचा खर्च MREGS मधून करावा. तसेच, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, कारण तो शेतजमिनींवर परिणाम करतोय.
दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथांना 6 हजार रुपये मासिक मानधन!
मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करावं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. ग्रामीण विकासाच्या प्रत्येक स्तरावर न्याय मिळवून देण्याचा निर्धार.