Rashmi Mane
सरकारी नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु झाली आहे!
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) मध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही संधी अनुभवी अभियंत्यांसाठी अतिशय खास आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2025
इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागेल.
तुम्हाला delhimetrorail.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो खालील पत्त्यावर पाठवायचा आहे:
General Manager (HR), Project DMRC Ltd., Metro Bhavan, Fire Brigade Lane, Barakhamba Road, New Delhi.
अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी career@dmrc.org या ई-मेलवर पाठवणे गरजेचे आहे. हे पाऊल अर्जाची वैधता निश्चित करेल.
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचलर डिग्री असावी. तसेच रेल्वे, केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागात कामाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच कॉम्प्युटर नॉलेज अनिवार्य आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 ते 57 वर्षांच्या दरम्यान असावे. यापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत.
उमेदवारांना प्रथम शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पार केल्यानंतर अंतिम निवड होईल.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,20,000 ते 2,80,000 इतका पगार मिळेल! तसेच दिल्ली मेट्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे!