इकडे गंभीर गुन्हा दाखल अन् तिकडे बच्चू कडू एव्हरेस्टच्या ट्रेकिंग : फोटो पाहिले का?

Rashmi Mane

बच्चू कडू पुन्हा चर्चेत

अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. एका बाजूला गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला ते एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकसाठी रवाना झाले आहेत. या विरोधाभासी घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

चांदूरबाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा बनाव करून एका व्यक्तीचा जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बच्चू कडू यांची भूमिका

बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी कोणाचा जीव घेणारा नाही, आम्ही समाजासाठी काम करणारे लोक आहोत,” असे म्हणत त्यांनी स्वतःची बाजू स्पष्ट केली आहे.

ट्रेकिंगचा आधीच होता प्लॅन

दरम्यान, बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकचे नियोजन १५ ते २० दिवसांपूर्वीच झाले होते. त्यामुळे याचा गुन्ह्याशी संबंध जोडू नये, असे त्यांनी सांगितले.

“मी पळून गेलेलो नाही”

मी कुठेही पळून गेलेलो नाही, असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही समाजासाठी काम करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संविधान आणि गीता सोबत

या ट्रेकदरम्यान त्यांनी भारतीय संविधान आणि भगवद्गीता सोबत घेतली आहे. यामागे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचले

नेपाळमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या दिशेने त्यांनी प्रवास केला असून, तिथले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Next : चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत? 'या' 2 टिप्स फोलो करा, लगेच पैसे मिळतील परत!

येथे क्लिक करा