चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत? 'हे' काम करा, लगेच पैसे मिळतील परत!

Rashmi Mane

चुकून पैसे दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले?

UPI किंवा बँक ट्रान्सफर करताना अनेकदा घाईत चुकीच्या अकाउंटवर पैसे जातात. अशा वेळी घाबरू नका योग्य स्टेप्स घेतल्यास पैसे परत मिळू शकतात.

लगेच काय कराल?

ट्रान्सफर झाल्यानंतर लगेच तुमच्या बँकेचा किंवा UPI अ‍ॅपचा स्क्रीनशॉट घ्या. ट्रान्झॅक्शन आयडी सेव्ह करा. हीच तुमची सर्वात महत्त्वाची माहिती आहे.

समोरच्याशी संपर्क करा

ज्यांच्या खात्यावर पैसे गेले आहेत त्यांना विनंती करा. बर्‍याच वेळा लोक प्रामाणिकपणे पैसे परत करतात.

बँकेत तक्रार करा

तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा किंवा ब्रँचमध्ये जा. ट्रान्झॅक्शनची माहिती देऊन तक्रार नोंदवा.

UPI अ‍ॅपमधून रिपोर्ट करा

Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या अ‍ॅपमध्ये “Raise Complaint” पर्याय असतो. तिथे तुमची तक्रार लगेच नोंदवा.

NPCI वेबसाइटवर तक्रार

National Payments Corporation of India (NPCI) च्या अधिकृत वेबसाईटवर जा. तक्रार नोंदवण्यासाठी [www.npci.org.in](http://www.npci.org.in) वापरा ही 24x7 सेवा उपलब्ध आहे.

24 तासांत मिळू शकतो दिलासा

जर तुमची तक्रार योग्य असेल, तर काही प्रकरणांमध्ये 24 तासांत ऑटोमॅटिक रिव्हर्सल होऊ शकते. पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असते.

पुढे काय लक्षात ठेवाल?

पैसे पाठवताना नाव आणि UPI ID नीट तपासा. घाई करू नका एक छोटी चूक मोठा त्रास देऊ शकते.

Next : ट्रम्प यांच्या आवाहनाला केराची टोपली; अमेरिकेचा थेट NATO ला इशारा, किती देशांना पडणार महागात?

येथे क्लिल करा