Pradeep Pendhare
प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष असून त्याची स्थापना 1999 मध्ये ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेत या पक्षाचे 2 आमदार आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून 'बॅट' हे चिन्ह मिळालं आहे. यापूर्वी प्रहार पक्षाने अनेकदा 'कप बशी' चिन्हावर निवडणूक लढवली होती.
निवडणूक आयोगाकडून 'बॅट' अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाल्यानं प्रहार जनशक्ती पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत 'बॅट' या चिन्हावर लढणार आहेत.
क्रिकेट माझा न आवडता खेळ आहे. पण मला अधिक आवडता करून जोमाने बॅटींग करावी लागणार आहे.
काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांनी विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांच्याकडून सध्या तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू आहे. महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी पक्षाला शिट्टी चिन्हं मिळालं होतं.