Roshan More
IAS सी वनमती यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. तामिळनाडूमधील झरोड जिल्ह्यातील वनमती यांनी घरच्या परिस्थितीवर मात करत IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सी वनमती यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.
लहानपणापासूनच तिला घरच्या कामात मदत करावी लागली. म्हशी चरायला जावे लागायचे.
सी वनमती यांनी लहानपणी टीव्ही मालिका पाहिली होती. त्यामध्ये मुख्य महिला कलाकारही कलेक्टर होती. तेव्हा वनमती यांनी आपणही कलेक्टर होणार हे ठरवले होते.
वनमती या 12 पास झाल्यानंतर त्यांच्या घरांच्यांनी तिचे लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला शिकायचे आहे. IAS व्हायचे आहे, असे सांगत वनमती यांनी लग्नाला विरोध केला.
वनमती यांचे वडील कॅब ड्रायव्हर होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र वनमती यांनी हार मानली नाही. संघर्षातून यश मिळवले.
2015 मध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये 152 वी रँक मिळवत वनमती IAS झाल्या.