Jagdish Patil
कोर्टाने सुनावणी दरम्यान पोलिसांच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला. तसेच शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही सुनावलं.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याचा अर्थ माहीत आहे काय? असा थेट सवाल कोर्टाने पोलिसांना केला.
बदलापूर प्रकरणातील तपासातील गलथान कारभारावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि पोलिसांना नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊ.
शाळांमध्ये मुली सुरक्षित नसतील, तर मग शिक्षण अधिकाराचा काय उपयोग? 4 वर्षांच्या मुलीही बळी पडताहेत ही कसली परिस्थिती? हे धक्कादायक आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं.
लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आणि मग तुम्ही SIT स्थापन करता ही लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दात सरकारला फटकारलं.
पोक्सो कारवाईचं काय झालं? असा सवाल करत POCSO कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश सरकारला दिले.
शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? असा प्रश्न न्यायालयाने बदलापूर पोलिसांना केला.
मुली आणि त्यांच्या पालकांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश सरकारला देत पुढील सुनावणी मंगळवारी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.