Jagdish Patil
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला.
आरोपी अक्षयला पोलिस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार केला.
यावेळी स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' कसा झाला? याबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.
त्यांनी सांगितलं, बदलापूरमधील 2 चिमुरड्या विद्यार्थींनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा गुन्हा अक्षय शिंदेवर दाखल होता.
शिंदे विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केलेला आणखी एक गुन्हा होता. याच गुन्ह्याचा तपास पोलिस करत होते.
याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन गेले आणि त्याचा ताबा तळोजा कारागृहामधून घेतला.
त्यानंतर पोलिस त्याला घेऊन जात असताना आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला.
यावेळी पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.